न्यायालयीन चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार

देहलीतील ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे प्रकरण

नवी देहली – २६ जानेवारीच्या दिवशी देहलीत ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे अन्वेषण सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने करावे, अशी मागणी करणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करतांना यात आताच दखल देण्यास नकार देत ‘यावर सरकारला योग्य ती कारवाई करू द्या. आम्हाला असे समजले आहे की, सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. ‘कायदा त्याचे काम करील’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्यही आम्ही पाहिले आहे’, असे न्यायालयाने म्हटले.