मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या आढळलेल्या गाडीमध्ये बनावट क्रमांकाच्या पाट्या सापडल्या होत्या. त्या सिद्ध करण्यात आलेले दुकान राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने शोधून काढले आहे; मात्र या दुकानाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही चित्रण निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे घेऊन गेले आहेत, अशी माहिती दुकानाचे मालक नवीन तलरेजा यांनी दिली आहे. या माहितीमुळे संबंधित प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सचिन वाझे यांसह अन्य ५ लोक दुकानात आले होते. त्यानंतर दुसर्यावेळीही काही जण आले होते; मात्र ‘त्या वेळी सचिन वाझे नव्हते’, असे तलरेजा यांनी सांगितले.