Jharkhand Durga Puja Violence : गढवा (झारखंड) येथे २ ठिकाणी मुसलमानांनी श्री दुर्गादेवीच्‍या मूर्ती विसर्जनाला विरोध केल्‍याने तणाव

पोलिसांनी मुसलमानांची बाजू घेतल्‍याचा हिंदूंचा आरोप

गढवा (झारखंड) – येथे धर्मांध मुसलमानांनी श्री दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन मिरवणूक रोखल्‍याने तणाव निर्माण झाला. येथे दोन वेगवेगळ्‍या घटना घडल्‍या. हिंदू ज्‍या मार्गाने मिरवणूक काढू इच्‍छित होते, त्‍या मार्गावर मुसलमानांनी आक्षेप घेतला. संतप्‍त हिंदूंनी प्रशासनाविरोधात निदर्शने केली.

१. पहिले प्रकरण गढवा येथील मतगढीचे आहे. येथे १३ ऑक्‍टोबरला हिंदूंनी मिरवणूक काढली असता मुसलमानांनी ‘हा प्रतिबंधित मार्ग आहे’ असे सांगत त्‍यांना थांबवले. यानंतर तणाव निर्माण झाला. वादविवाद होऊन मुसलमानांनी दगडफेक चालू केली. या वेळी पोलिसांनी लाठीमार केला, तसेच अश्रूधुराच्‍या नळकांड्या फोडल्‍या. त्‍यांतर पोलिसांनी गोळीबार झाला. यात एक जण घायाळ झाले. या घटनेचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाला आहे. हिंदूंनी पोलिसांवर मुसलमानांची बाजू घेत असल्‍याचा आरोप केला. त्‍यामुळे पोलीस आणि हिंदु संघटना यांच्‍यात वाद झाला. ज्‍या मार्गावरून विसर्जन मिरवणूक काढली गेली, त्‍या मार्गावरून यापूर्वीही वाद झाल्‍याचे पोलिसांचे म्‍हणणे आहे. हिंसाचारात काही पोलीसही घायाळ झाले. पोलिसांनी मुसलमानांऐवजी काही हिंदूंनाच कह्यात घेतले. सध्‍या येथे संचारबंदी घोषित करण्‍यात आली आहे.

२.  दुसरे प्रकरण गढवा जिल्‍ह्यातील लखना गावातील आहे. येथेही मुसलमानांनी मिरवणुकीला विरोध करत ती अडवली. ‘या मार्गाने विसर्जन मिवरणूक काढता येणार नाही’, असे ते म्‍हणाले. या वेळी तणाव निर्माण झाला. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनी दोन्‍ही बाजूंकडील लोकांशी चर्चा केली; मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे भाविक संतप्‍त झाले. प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत घोषणाबाजी चालू केली.

घटनास्‍थळी पोचलेले भाजपचे माजी आमदार सत्‍येंद्र नाथ तिवारी यांनी ‘मुसलमानांनी बळाचा वापर केला’, असा आरोप केला. ते म्‍हणाले की, ज्‍या रस्‍त्‍यावर मिरवणूक थांबवण्‍यात आली आहे, तो रस्‍ता शासनाच्‍या पैशांतून बनवण्‍यात आला आहे. या मार्गावरून प्रतिवर्षी देवीच्‍या मूर्तीची मिरवणूक जाते. जेव्‍हा मुसलमानांच्‍या मोहरमची मिरवणूक या रस्‍त्‍यावर येते, तेव्‍हा हिंदू मुसलमानांना सरबत वाटतात. (आता असे करायचे का ? याचा विचार हिंदूंनी केला पाहिजे ! – संपादक)

दोन्‍ही पक्षांच्‍या चर्चेनंतर हे प्रकरण मिटल्‍याचे पोलिसांनी सांगितले. काही बाहेरच्‍या लोकांनी ही वादग्रस्‍त परिस्‍थिती निर्माण केली असून त्‍यांच्‍यावर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

झारखंडमध्‍ये झारखंड मुक्‍ती मोर्चाचे सरकार असल्‍याने ते हिंदूंची नाही, तर मुसलमानांचीच बाजू घेणार ! याविषयी काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत !