Bengal Durga Puja Violence : श्‍यामपूर (बंगाल ) येथे दुर्गापूजेचा मंडप मुसलमानांनी पेटवला !

  • मंडपातील देवतांच्‍या मूर्तींची तोडफोड !

  • पोलिसांवरही आक्रमण !

कोलकाता – बंगालमध्‍ये दुर्गापूजेच्‍या उत्‍सवाच्‍या वेळी हावडा जिल्‍ह्यातील श्‍यामपूर भागात हिंसाचार उसळला. काही धर्मांध मुसलमानांनी दुर्गापूजा मंडप पेटवला, तसेच मूर्तींची तोडफोड केली. काहींनी विसर्जन घाटावर दगडफेकही केली. त्‍यामुळे दुर्गापूजा उत्‍सवाच्‍या वेळी तणाव निर्माण झाला. येथे जमावबंदी आदेश लागू करण्‍यात आला आहे.

या प्रकरणी हावडा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक स्‍वाती भंगालिया यांनी गुन्‍हा नोंदवून आरोपींना अटक केली. त्‍या म्‍हणाल्‍या की, आम्‍हाला काही पूजा मंडपांमध्‍ये तोडफोड झाल्‍याच्‍या तक्रारी लोकांकडून मिळाल्‍या आणि आम्‍ही तातडीने पोलिसांना घटनास्‍थळी पाठवले. काही लोकांनी पोलिसांवरही आक्रमण केले. आता परिस्‍थिती नियंत्रणात आहे.

भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला हिंसाचाराचा निषेध !

बंगालमधील भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी हिंसाचाराचा निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्‍याची मागणी केली. मूर्ती विसर्जनाच्‍या वेळी झालेली दगडफेक आणि मूर्तींची तोडफोड प्रकरणी बंगालच्‍या गृहसचिवांना त्‍वरित हस्‍तक्षेप करावा, अशी मागणी सुवेंदू अधिकारी यांनी केली.

भाजपच्‍या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्‍या नेतृत्‍वाखालील बंगाल सरकारवर टीका करतांना ‘धर्मांधांनी दुर्गापूजा मंडप आणि श्री दुर्गादेवीची मूर्ती यांना लक्ष्य केले आणि गदारोळ केला. हा प्रकार सांस्‍कृतिक आणि धार्मिक वारशाचा अपमान करणारा आहे’, असे म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • बंगालमध्‍ये जोपर्यंत राष्‍ट्रपती राजवट लागू केली जात नाही, तोपर्यंत तेथे कधीचही शांतता निर्माण होणार नाही. यात हिंदूंची ससेहोलपटच होत रहाणार, हीच वस्‍तूस्‍थिती आहे !
  • आक्रमण होऊनही पोलीस कठोर कारवाई करत नाहीत, हे तृणमूल काँग्रेस सरकारला लज्‍जास्‍पद !