वर्ष २०२४ मध्ये सप्टेंबर मासात पितृपक्षास आरंभ झाल्यापासून मला तीव्र स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास होऊ लागला. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्या त्रासाने टोक गाठले. नवरात्रीला आरंभ होताच पुढील काही दिवसांत मला काही कविता सुचल्या त्या मी श्री मां जगदंबा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करतो.
जगदंबे आलो तव चरणी शरण ।
आवरता न आवरे मन माझे ।
होई आतुर रूप पहाण्या तुझे ।। १ ।।
मनी विचार येता तव दर्शनाचा ।
विसर पडला मज सुखदुःखाचा ।। २ ।।
आंदोलने मम मनी स्मरण होता तुझे ।
सळसळे चैतन्य देहामधूनी अधीर मन माझे ।। ३ ।।
नष्ट झाली मलिनता चित्तास होता स्पर्श ।
आवरता न आवरे मन होता तव भावस्पर्श ।। ४ ।।
जगदंबे आलो तव चरणी शरण ।
ध्यास लागो सदैव होण्या तव स्मरण ।। ५ ।।
कृपादृष्टी तुझी सर्वांवरी ।
देई आशिष स्थापण्या हिंदु राष्ट्र भूवरी ।। ६ ।।
– श्री. धैवत विलास वाघमारे, (३.१०.२०२४)
_____________________________________________
गुरु शिकवती ‘वसुधैव कुटुंबकम्’ ।
गुरुकृपायोग असे विहंगम मार्ग ।
गुरु दावती जेथे साधका मोक्षमार्ग ।। १ ।।
‘वसुधैव कुटुंबकम्’ सांगती संत ऋषिजन ।
गुरु शिकविती साधका ते नित्य आचरण ।। २ ।।
सनातनचा हा साधना सिंधु ।
सदैव रक्षति साधकां कृपासिंधु ।। ३ ।।
आसेतुहिमाचल सनातनचे कुळी ।
ओळख मिळे साधकां वेगळी ।। ४ ।।
अहर्निश साधक ते तत्पर सेवेसी ।
त्याग, प्रेम, निष्ठा, नित ठावे तयांसी ।। ५ ।।
ऐसा परिवार सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा ।
चालती वाट घेऊनी ध्यास मोक्षप्राप्तीचा ।। ६ ।।
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |