नवरात्रीच्या कालावधीत साधिकेला देवीच्या अस्तित्वाविषयी आलेल्या अनुभूती  

‘एका वर्षी नवरात्रीच्या काळात मी देवीला प्रार्थना करत असे की, ‘हे देवी, तुझे अस्तित्व कसे अनुभवायचे ?’, हे तूच मला शिकव.’ प्रार्थना करतांना मी एखाद्या लहान बालकाप्रमाणे देवीच्या चरणी शरणागतभावाने नतमस्तक होत असे. त्या वेळी देवीच्या कृपाशीर्वादाने मला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.  

१. मी स्थुलातून देवीला पाहू शकत नव्हते; मात्र देवी माझ्या समवेत असल्याचे मला जाणवत असे.

२. मी चालत असतांना माझ्या पैंजणांचा आवाज होत असे. त्या वेळी ‘देवीच माझ्या समवेत चालत आहे’, असे मला जाणवत असे.

३. मी माझ्या पायांकडे पहात असतांना ‘मी माझ्या पायांकडे पहात नसून देवीच्या पायांकडेच (चरणांकडे) पहात आहे’, असे मला जाणवत असे.

४. नवरात्रीच्या कालावधीत प्रतिदिन रात्री ‘देवी माझ्या पलंगावर झोपली असून मी खाली भूमीवर झोपले आहे’, असे मला जाणवत असे.

नवरात्रीत देवीने मला तिच्या अस्तित्वाच्या अनुभूती दिल्याबद्दल मी तिच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक