Love Jihad : शिरोली येथे जागृती होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी ‘लव्ह जिहाद’चे पुष्कळ ग्रंथ महिलांना वितरित केले !

कोल्हापूर – नवरात्रोत्सवात शिरोली येथील बिरदेव मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. साधना गोडसे यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन केले.  हा विषय मंदिरातील पुजारी श्री. हरी पुजारी यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.

हा विषय ऐकल्यानंतर गावातील युवती आणि महिला यांच्यामध्ये जागृती होण्यासाठी तेथील हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित ‘लव्ह जिहाद’चे पुष्कळ ग्रंथ प्रायोजित करून तेथील महिलांना विनामूल्य वितरण केले.