काश्मीरमध्ये पनून काश्मीरची स्थापना करायलाच हवी ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

चर्चा हिंदु राष्ट्राची ! काश्मिरी हिंदूंचे विस्थापन म्हणजे केवळ राजकीय षड्यंत्र नसून हिंदु धर्मावरील आघातच आहे. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर आमचा वंशविच्छेद झाला आहे, हे प्रथम अधिकृतरित्या मान्य करावे लागेल !

टिकरी सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकर्‍याची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्याने केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. कर्मबीर (वय ५२ वर्षे) असे या शेतकर्‍याचे नाव असून तो हरियाणातील जिंद येथील सिंघवाल गावात रहाणारा आहे.

वेब सिरीजच्या नावाखाली ‘पॉर्न व्हिडिओ’चे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला अटक

अश्‍लीलतेला प्रोत्साहन देणार्‍या वेब सिरीजवर बंदीच आणायला हवी !

बारामती येथील गुन्हेशोध पथकाकडून ११ आरोपींना अटक : १२ पिस्तुलांसह २० काडतुसे हस्तगत

मध्यप्रदेशमधून पिस्तुल आणून महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तूल पुरवणारी यंत्रणा उघडकीस

उत्तरप्रदेशातील मदरशांना मिळणार्‍या सरकारी निधीतील घोटाळ्याची चौकशी होणार !

मदरशांना देण्यात येणारा सरकारी निधीच बंद का करत नाही ?

देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०२१ मधील जाहीर सभांचे रणशिंग फुंकले !

काशीतील ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वेश्‍वर मंदिर प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा पक्षकार बनवण्यासाठी अर्ज

मंदिर पक्षकारांकडून ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मथुरा येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून विहंगम प्रसार

आदर्श रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हिरे व्यापारी मेहूल चोक्सीची १४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

येथील पंजाब नॅशनल बँकेतील १३ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रिव्हेंशन अ‍ॅक्टअंतर्गत गीतांजली ग्रुप आणि याचे प्रमोटर मेहूल चोक्सी यांची येथील १४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी लष्करासाठी बैठकीत भाग घेतल्याचे सिद्ध करा ! – उच्च न्यायालयाचा आदेश

वर्ष २००८ मालेगाव (जिल्हा नाशिक) स्फोटाच्या संदर्भात अटक करण्यात आलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याकडून येथील उच्च न्यायालयात त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप काढून टाकण्यासाठी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.