हिरे व्यापारी मेहूल चोक्सीची १४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

मेहूल चोक्सी

मुंबई – येथील पंजाब नॅशनल बँकेतील १३ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रिव्हेंशन अ‍ॅक्टअंतर्गत गीतांजली ग्रुप आणि याचे प्रमोटर मेहूल चोक्सी यांची येथील १४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पसार हिरे व्यापारी मेहूल चोक्सी ३ वर्षांपूर्वी देशातून पळून गेला होता. ईडीने यापूर्वीही मेहूल आणि या प्रकरणातील इतर आरोपी यांची संपत्ती जप्त केली आहे.