बारामती येथील गुन्हेशोध पथकाकडून ११ आरोपींना अटक : १२ पिस्तुलांसह २० काडतुसे हस्तगत

मध्यप्रदेशमधून पिस्तुल आणून महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तूल पुरवणारी यंत्रणा उघडकीस

बारामती (पुणे) – येथील जेवणाच्या देयकावरून हॉटेलचालकाला झालेल्या मारहाणीतून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतांना पिस्तुल पुरवणार्‍या गुन्हेगारांविषयी पोलिसांना समजले. मध्यप्रदेशमधून अवैधरित्या पिस्तुल आणून महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तुल पुरवणारे रॅकेट उघडकीस आणून गुन्हेशोध पथकाने विविध गुन्हे नोंद केले आणि ११ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १२ पिस्तूले आणि २० काडतुसे हस्तगत केली आहेत. यापूर्वीच मध्यप्रदेशमधून गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तुल पुरवणार्‍या प्रमुखालासुद्धा गुन्हेशोध पथकाने कह्यात घेतले होते.

या प्रकरणी अल्ताफ सज्जद पठाण, जफर अन्सार इनामदार, जावेद मुनीर सय्यद यांच्यासह अन्य दोघांविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.