टिकरी सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकर्‍याची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये केंद्र सरकारवर कृषी कायद्यांवरून आरोप

नवी देहली – गेल्या ७० हून अधिक दिवसांपासून येथील सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांपैकी एका शेतकर्‍याने टिकरी सीमेवर आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याने येथील सेक्टर ९ जवळ बायपास पार्कमध्ये एका झाडाला लटकवून घेतले.

आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्याने केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.

(सौजन्य : Oneindia Hindi)

कर्मबीर (वय ५२ वर्षे) असे या शेतकर्‍याचे नाव असून तो हरियाणातील जिंद येथील सिंघवाल गावात रहाणारा आहे. कर्मबीर याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये सरकारवर आरोप करतांना कृषी कायदे मागे घेण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याने अप्रसन्नता व्यक्त केली आहे. तसेच ‘हे काळे कायदे कधी रहित होतील ठाऊक नाही. जोपर्यंत ते रहित होत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही’, असे म्हटले आहे.