देशभरात शेतकर्‍यांच्या ‘रस्ता बंद’ आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद

देहलीच्या सीमेवर ३ कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांनी देशभरात दुपारी १२ ते ३ या वेळेत ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.

भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात उल्लेखनीय यश मिळवले ! – जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक

भारतात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असले, तरी उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे.

एल्गार परिषदेचे आयोजक बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची ब्राह्मण महासंघाची मागणी !

प्रतिवर्षी एल्गार परिषद घेणार आणि अखेरच्या श्‍वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाला विरोध करणार.- कोळसे पाटील

ग्रेटा थनबर्ग हिने शेअर केलेल्या ‘टूलकिट’मध्ये शेतकरी आंदोलनामागे खलिस्तान्यांचा हात असल्याची माहिती

भारतामधील आंदोलनामागे परदेशातून हस्तक्षेप केला जातो, आंदोलन कसे करावे, याचे नियोजन केले जाते आणि त्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळत नाही आणि नियोजनानुसार हिंसाचार होतो, हे भारताला लज्जास्पद !

मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून प्रारंभ होणार

ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनच होणार असल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. ८ मार्च ते १८ मार्च या कालावधीत ही सुनावणी पार पडणार आहे.

विदेशांतील कारागृहांमध्ये ७ सहस्र १३९ भारतीय नागरिक अटकेत

सर्वाधिक १ सहस्र ५९९ भारतीय नागरिक सौदी अरेबियातील कारागृहांत अटकेत आहेत. काही देशांमध्ये खासगी माहिती उघड न करण्याच्या कायद्यांमुळे विस्तृत माहिती मिळालेली नाही.

सरकार दीप सिद्धू याला अटक करत नाही; मात्र २०० शेतकर्‍यांना अटक करते ! – संजय राऊत यांची राज्यसभेत सरकारवर टीका

आपल्या देशात अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्यासारख्या लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढणार्‍या शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवले जाते.

फरिदाबाद येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती अखंड कार्यरत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येतात. या हिंदु राष्ट्र जागृती सभांचा मुख्य उद्देश ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी सामान्य हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांना संघटित करणे’, हा आहे.

भारतात १ पोलीस कर्मचारी करतो ६४१ लोकांची सुरक्षा !

१ लाख लोकसंख्येमागे केवळ १५६ पोलीस ! देशातील लोकांची सुरक्षा पहाता नेते अधिक सुरक्षित आहेत, हेच लोकांना दिसते ! लोकशाहीमध्ये जनतेची सुरक्षा वार्‍यावर असणे लज्जास्पद !

जगातील कोणत्याही देशाच्या सरकारने शेतकरी आंदोलनाचे समर्थन केलेले नाही ! – केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण

कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि काही युरोपीयन देशांमध्ये भारतीय कृषी कायद्यांविषयी काही ‘प्रेरित’ भारतीय वंशाच्या व्यक्तींनी या कायद्यांना विरोध केला आहे.