शहरात २७ ठिकाणी कार्यक्रम !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ६ ऑक्टोबर या दिवशी शहरातील विविध भागांतील १९ ठिकाणी तर ५, १२ आणि १३ ऑक्टोबर या दिवशी ८ ठिकाणी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील २७ भागांत मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक या उत्सवात सहभागी होणार आहेत. या वेळी शारीरिक, घोष प्रात्यक्षिके, गीत-गायन या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन आणि अनुभवी वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित रहाणार आहेत. १२ ऑक्टोबरला विविध भागांत पथसंचलनाचेही आयोजन करण्यात आले असून अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रा.स्व. संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक श्री. विनोद बन्सल यांनी केले आहे.
विविध भागांतील काही कार्यक्रम स्थान खालीलप्रमाणे
- संभाजीनगर
वक्ते : हेमंत हरहरे
प्रमुख अतिथी : महादेव भांडवलकर
- देहूरोड
वक्ते : बाळासाहेब लोहकरे
प्रमुख अतिथी : पवन गोयल
- चिखली
वक्ते : रघुनाथ देविकर
प्रमुख अतिथी : ह.भ.प. सुवर्णाताई कुलकर्णी
- सांगवी
संत तुकारामनगर, पंडित दीनदयाळ उपाध्याय महापालिका शाळा
वक्ते : जयदीप धर्माधिकारी