तरुणांनो, उठा आणि देशसेवेसाठी सिद्ध व्हा !

छोट्याशा संकटाला नका घाबरू ।।
क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण करू ।।
देशसेवेचे व्रत न जाई व्यर्थ ।।
तरुणांनो, उठा जागे व्हा आणि करा जीवन सार्थ ।।

वेळेचे सुनियोजन करून राष्ट्र आणि धर्मकार्य यांसाठीही वेळ द्या !

वेळेचा योग्य प्रकारे उपयोग करून अधिकाधिक वेळ सत्कारणी, म्हणजे देव, देश आणि धर्म यांच्यासाठी दिला पाहिजे. त्यासाठी वेळेचा अपव्यय टाळून परिश्रमपूर्वक कर्म करणे आवश्यक आहे. देवाला प्रार्थना करून नियोजन आणि कृती केल्याने कार्य वेळेत पूर्ण होण्यासाठी साहाय्य होईल !

भौतिक विकासाच्या दृष्टीने धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !

धर्म ही अशी गोष्ट आहे की, जी काम, क्रोध, लोभ आदी षड्रिपूंवर विजय मिळवण्यास शिकवते. त्यामुळे केवळ भौतिक विकास साध्य करून नाही, तर लोकांना धर्म शिकवून नीतीमान बनवणेही तितकेच आवश्यक आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

सनातनची ग्रंथमालिका : राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे उपाय

♦ हिंदूंच्या वंशनाशासाठी छळ, कपट, प्रलोभने आदींद्वारे नियोजनबद्ध होत असलेले धर्मांतर !
♦ धर्मांतराद्वारे हिंदुस्थानला ‘पूर्वेकडील रोम’ अन् ‘मुगलस्थान’ करण्याचा पंथांध शक्तींचा डाव !
♦ धर्मांतराच्या विविध डावपेचांचा प्रतिकार करा !

अंती होईल स्थापना ईश्वरी राज्याची ।

विरोध करती हिंदु अधिवेशनाला। राष्ट्र-धर्म कार्याला । ते राष्ट्र-धर्म द्रोही ।। १ ।।
बरोबरच आहे, सिद्ध होते यातून अधर्माला धर्म मान्य नाही ।

भौतिक विकासापेक्षा आत्मिक विकास श्रेष्ठ !

‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र, म्हणजेच ईश्वरी राज्य !

‘हिंदु राष्ट्र’ म्हटले की, त्याकडे ‘हिंदूंचे राष्ट्र’ अशा काहीशा संकुचित अर्थाने पाहिले जाते. तथापि ‘हिंदु राष्ट्र’ ही मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, वृक्ष, वेली आदींपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी एक ईश्वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था असेल; म्हणून तिला ‘ईश्वरी राज्य’ म्हणता येईल.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

राष्ट्राची संकल्पना !

‘राष्ट्र’ म्हणजे केवळ भौतिक भूमी अपेक्षित नसून ती धर्म, संस्कृती, परंपरा, इतिहास, ग्रंथ, उत्सव इत्यादी सर्वांना अभिव्यक्त करणारी जिवंत संकल्पना आहे.’

थोड्याच दिवसांत ‘हिंदु राष्ट्र’ दिसणार आहे ।

लहानशी ‘हिंदु जनजागृती समिती’ मोठे कार्य करत आहे ।
सर्वस्वाचा त्याग करून हिंदू पोटतिडकीने एकत्र येत आहेत ।
हिंदु बांधवांनी आनंदाने रहावे, हीच त्यांची इच्छा आहे ।
थोड्याच दिवसांत ‘हिंदु राष्ट्र’ दिसणार आहे ।।

हिंदु बांधवा, तुझ्याचसाठी हा अट्टाहास ।

वेळ न आता मौज-मजेची अन् निद्रिस्ततेची ।
विचारांना जोड दे आता तत्परतेने कृतीची ।।
कलियुगी हीच रीत आहे भक्तीची ।।
दाखवूया राष्ट्र-धर्म द्रोह्यांना झलक संघशक्तीची ।।