देशबांधवांनो, राष्ट्रभक्त असाल, तरच तुम्हाला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे !

पू. संदीप आळशी

‘आज आपण उपभोगत असलेले राष्ट्राचे स्वातंत्र्य आपल्याला कुणी दान म्हणून दिलेले नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्राच्या सीमेवर लढणारे सैनिक यांचे रक्त अन् घाम यांच्या सिंचनातून ते स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे ! या शूरवीरांनी एका हातात तुळशीपत्र आणि एका हातात धगधगता निखारा घेऊनच जणू भारतमातेला आवाहन केले होते, ‘बोल माते, तुझ्यासाठी घरादारावर काय ठेवू ? तुळशीपत्र कि निखारा ?’

देशबांधवांनो, आपण राष्ट्रावर प्रेम करतो; पण राष्ट्रभक्ती करत नाही. प्रेम भावनेच्या स्तरावर असते, तर भक्ती त्यागाच्या स्तरावर असते. आपण अगदी सीमेवर जाऊन शत्रूशी लढू शकलो नाही, तरी राष्ट्रभक्त बनूया आणि संकल्प करूया, ‘आजपासून मी कुठलाही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा अवमान रोखेन, स्वतःच्या आणि माय-भगिनींच्या रक्षणासाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेईन, अन्यायग्रस्त हिंदु बांधवांच्या साहाय्याला तत्परतेने धावून जाईन, राष्ट्र कार्यात तन, मन आणि धन अर्पण करून सहभागी होईन.’ या संकल्पानुसार आपण कृती केली, तरच आपल्याला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (८.८.२०१९)