MP Rape Victim Justice : ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा

२ जानेवारीच्या घटनेवर ११ एप्रिलला निकाल !

आरोपी अजय वाडिबाला

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील सिवनी मालवा येथे ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी आरोपी अजय वाडिबाला याला फाशीची शिक्षा सुनावली. तसेच ३ सहस्र रुपयांचा दंड भरण्याचा आणि पीडितेच्या कुटुंबाला ४ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचाही आदेश दिला. २ जानेवारी २०२५ या दिवशी ही घटना घडली होती. अजय याने या मुलीचे अपहरण करून तिला झुडुपात नेले आणि तिचे बलात्कार केला. तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्यावर तिचा गळा दाबून हत्या केली आणि तेथेच मृतदेह फेकून दिला होता.

संपादकीय भूमिका

प्रत्येक बलात्काराच्या घटनेत अशाच प्रकारची शिक्षा जलद गतीने झाल्यास देशातील बलात्कारांच्या घटनांना काही प्रमाणात तरी चाप बसेल, यात शंका नाही !