मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देणारे मुंबई ‘महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२४’ संमत !

‘मुंबई आणि अन्य महापालिका यांना एकच कायदा करावा’, या प्रश्नाविषयी उदय सामंत यांनी ‘मुंबई महापालिकेची लोकसंख्या १ कोटी ४० लाखांच्या पुढे असल्यामुळे एकच कायदा अन्य महापालिकांना लागू करू शकणार नाही’, असे सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे अनधिकृत कार्यालय पाडल्याने कार्यकर्ते आक्रमक !

मुंबई महानगरपालिकेने वंचित बहुजन आघाडीचे एक अनधिकृत कार्यालय पाडल्याने पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी कुर्ला रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता रोखून धरला. कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मुंबई महापालिकेची रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू !

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, हाच यामागील मूळ उपाय आहे !

मुंबईत पाणीकपात ?

१ मार्चपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात होऊ शकते. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या सातही तलावांतील पाणीसाठा वेगाने अल्प होत आहे. त्यांत केवळ ४८ टक्के पाणीसाठा उरला आहे.

मुंबई महानगरपालिकेची सहस्रो कोटी रुपयांची पाणीपट्टी थकित !

एवढी पाणीपट्टी थकित राहीपर्यंत महापालिका प्रशासन शांत का ? यापूर्वीच त्यांच्यावर कडक कारवाई का झाली नाही ?

मुंबई महापालिका महिलांच्या सुरक्षेसाठी ‘ॲप’ सिद्ध करणार !

महापालिकेच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी ‘ॲप’ सिद्ध केले जाणार आहे. संकटात असणार्‍या महिलांना ‘ॲप’मुळे तात्काळ साहाय्य मिळेल, अशी यंत्रणा उभी केली जाणार आहे. ॲपच्या साहाय्याने महिला पोलीस, पालिका किंवा सामाजिक संस्था यांच्याशी संपर्क साधू शकेल.

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मैदानासाठीच वापरली जाणार ! – आयुक्त इक्बालसिंह चहल

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ही फक्त मैदानासाठी वापरली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले आहे.

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ‘ईडी’ची धाड !

जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ‘जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचे पंचतारांकित हॉटेल बांधले’, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

महापालिकेचे अधिकारी एवढे अतार्किक किंवा बेफिकीर कसे असू शकतात ? – मुंबई उच्च न्यायालय

पदपथावर बसवण्यात आलेल्या स्टीलच्या खांबांमध्ये (बोलार्ड) अगदी अल्प अंतर ठेवल्यामुळे ‘व्हीलचेअर’ (चाकाची आसंदी) वापरणार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई महापालिका मनोरंजन करात वाढ करणार !

मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सर्कस, आनंदबाजार यांचे प्रयोग आणि खेळ यांच्यावरील रंगभूमी करात वाढ करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. गेल्या १३ वर्षांत ही करवाढ करण्यात आली नव्हती.