वर्धा येथे मौलानाकडून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार !

येथील रामनगर परिसरात समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान (वय २५ वर्षे) या मौलानाने ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अमानुष अत्याचार केले. ही घटना १९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता घडली. पोलिसांनी समीउल्ला याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मौलवीकडून मदरशातील विद्यार्थिनीवर बलात्कार !

असे वासनांध मौलवी असलेल्या मदरशांमधून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण मिळत असेल ? याचा विचारच न केलेला बरा !

पाकमध्ये मदरशामध्ये बलात्कार करणार्‍या मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) जन्मठेपेची शिक्षा

पाकच्या एका न्यायालयाने १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अतीक उर् रहमान नावाच्या मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला २ लाख रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.

जमशेदपूर (झारखंड) येथे भूतबाधा झाल्याच्या संशयावरून मौलवीकडून बांधून ठेवण्यात आलेल्या मुलीची विहिंपकडून सुटका

विश्‍व हिंदु परिषदेनेने १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी येथील इमामवाडामधून लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आलेल्या एका हिंदु मुलीची सुटका केली.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे मदरशामध्ये ६ वर्षांच्या मुलाला लोखंडी साखळीने बांधल्याची घटना उघड

अशा घटना उघडकीस आल्याने मदरशांना राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे दिले जाणारे अनुदान आता कायमचे बंद केले जावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील मशिदीमध्ये कुराण शिकण्यासाठी गेलेल्या १२ वर्षांच्या मुलाचे मौलवीकडून लैंगिक शोषण !

चर्च आणि मशिदी यांमध्ये मुलांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना समोर येत असतांना याविषयी प्रसारमाध्यमे कधी चर्चासत्रे आयोजित करत नाहीत कि पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध मौलाना कलीम सिद्दीकी यांना धर्मांतराच्या प्रकरणी अटक

देशातील प्रत्येक मौलाना, मौलवी आणि इमाम यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या मताचे स्वागत ! – मौलाना खालिद रशीद फिरंगी महली, सदस्य, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

केवळ असे स्वागत करणे अपेक्षित नाहीत, तर प्रत्यक्षात गोहत्या होऊ नये, यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रयत्न केले पाहिजेत !

मेवात (हरियाणा) जिल्ह्यात मौलानांकडून हिंदु युवकाचे धर्मांतर

या प्रकरणी चौघांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांपैकी अबू बकर याला अटक केली असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.

पाकिस्तानमध्ये ५० वर्षीय मौलवीकडून ३ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीवर बलात्कार !

पाकिस्तानमध्ये कट्टरतावादी धर्मांधांपासून अल्पसंख्यांक समाजातील लहान मुलीही सुरक्षित नाहीत, हेच या घटनेवरून लक्षात येते. यावरून तेथील महिलांची स्थिती किती भयावह असेल, याची कल्पना करता येईल.