अलीगड (उत्तरप्रदेश) येथील मशिदीमध्ये कुराण शिकण्यासाठी गेलेल्या १२ वर्षांच्या मुलाचे मौलवीकडून लैंगिक शोषण !

चर्च आणि मशिदी यांमध्ये मुलांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना समोर येत असतांना याविषयी प्रसारमाध्यमे कधी चर्चासत्रे आयोजित करत नाहीत कि पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील रोरावर भागातील एका मशिदीत कुराण शिकण्यासाठी येणार्‍या १२ वर्षांच्या मुलाचे तेथील मौलवीकडून लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मुलाने घरी जाऊन घडलेल्या घटनेची माहिती सांगितल्यावर मौलवीविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली. त्यानंतर मौलवीला अटक करण्यात आली. या प्रकरणी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.