जमशेदपूर (झारखंड) येथे भूतबाधा झाल्याच्या संशयावरून मौलवीकडून बांधून ठेवण्यात आलेल्या मुलीची विहिंपकडून सुटका

डावीकडे लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आलेली हिंदु मुलगी

जमशेदपूर (झारखंड) – विश्‍व हिंदु परिषदेनेने १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी येथील इमामवाडामधून लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आलेल्या एका हिंदु मुलीची सुटका केली. या मुलीला भूतबाधा झाल्याच्या संशयावरून तिच्या पालकांनी तिला येथे आणले होते आणि रफीक नावाच्या मौलवीने तिला बांधून ठेवले होते. भूत घालवण्याच्या नावाखाली रफीक तिला मारहाण करत होता.

याविषयी विहिंपचे जमशेदपूर जिल्हाध्यक्ष अजय गुप्ता यांनी आरोप केला की, मुलीच्या पालकांचे धर्मांतर करण्यासाठी त्यांचा बुद्धीभेद करण्यात येत होता. पालक विहिंपची बाजू घेण्याऐवजी रफीक याची बाजू घेत होते. या मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले असू शकते, असा आम्हाला संशय आहे.