वर्धा येथे मौलानाकडून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार !

  • स्वतःला अल्पसंख्य म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक
  • या घटनेविषयी काँग्रेसी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आदी गप्प का आहेत ? – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

वर्धा – येथील रामनगर परिसरात समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान (वय २५ वर्षे) या मौलानाने ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अमानुष अत्याचार केले. ही घटना १९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता घडली. पोलिसांनी समीउल्ला याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. मौलानाचे शिक्षण सूरत येथील जामिया इस्लामिया अरबी मदरशात पूर्ण झाले आहे. तो गेल्या २ वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहे. मौलाना समीउल्ला याने पीडित मुलाला एका खोलीत नेऊन त्याच्या समवेत अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर मुलाला दमदाटी करून हाकलून दिले. पीडित मुलाने हा संतापजनक प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी समीउल्ला याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.