सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि विरोधी पक्ष भाजप यांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत ७ एप्रिलनंतर ८ एप्रिललाही वक्फ सुधारणा कायद्यावरून गदारोळ झाला. नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी या कायद्यावर चर्चा करण्याची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी केली. या वेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप यांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. आदल्या दिवशी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी कायद्याची प्रत फाडली होती. यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमध्ये आतंकवाद आहे, तर विधानसभेत सत्ताधारी पक्षाचा आतंकवाद आहे, हे या घटनेतून लक्षात येते ! |