Mamata Banerjee On Waqf Bill : (म्हणे) ‘बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही !’ – ममता बॅनर्जी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) –बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू केला जाणार नाही, अशी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे जैन धर्मियांच्या एका कार्यक्रमात बोलतांना केली.

(म्हणे) ‘राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यास चिथावणी देणार्‍यांपासून सावध रहा !’

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, अल्पसंख्यांकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आम्ही पावले उचलू. मला ठाऊक आहे की, तुम्ही वक्फ सुधारणा कायद्याच्या कार्यवाहीवर (अंमलबजावणीवर) अप्रसन्न (नाराज) आहात. विश्वास ठेवा, बंगालमध्ये असे काहीही घडणार नाही, ज्यामुळे समाजात फूट निर्माण करून कुणीही राज्य करू शकेल. बंगालमध्ये रहाणार्‍या लोकांना संरक्षण देणे, हे आमचे काम आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, जर कुणी तुम्हाला राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यास चिथावणी देत असेल, तर कृपया तसे करू नका. कृपया लक्षात ठेवा की, मी तुमचे आणि तुमच्या मालमत्तेचे रक्षण करेल. जर आपण एकत्र राहिलो, तर आपण जग जिंकू शकतो.

संपादकीय भूमिका

भारतीय राज्यघटनेचे रक्षक म्हणवणारेच राज्यघटनेचे तीन तेरा वाजवत आहेत,  हे लक्षात घ्या ! संसदेने संमत केलेल्या कायद्याला हुकूमशाही पद्धतीने विरोध करणारी अशा प्रकारची फुटीरतावादी वृत्ती ठेचण्यासाठी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !