राजभवनात मुसलमानांना नमाजासाठी देण्यात आलेल्या जागेप्रमाणे हिंदूंनाही उपासनेसाठी मोठी जागा द्यावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यपालांकडे केली आहे

गर्भनिरोधकसंबंधी अश्‍लील विज्ञापने तरुणांच्या मनावर परिणाम करतात ! – मद्रास उच्च न्यायालयाचे मदुराई खंडपीठ

‘गर्भनिरोधक आणि अंतर्वस्त्र विकण्याच्या नावावर चालवण्यात येणारी विज्ञापने सर्व वयाच्या लोकांकडून पाहिली जातात आणि सर्व वाहिन्यांवर दाखवली जातात. या विज्ञापनांमध्ये दाखवली जाणारी नग्नता हा गुन्हा आहे.

कंगना राणावत यांचे कार्यालय पूर्ववत करून देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश.

या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे, ‘‘कंगना यांच्या कार्यालयाच्या नुकसानीचा व्यय मुख्यमंत्र्यांच्या खिशातून करावा. या सुडाच्या राजकारणाचा भुर्दंड सरकारी तिजोरीतून कशाला ?”

दुसर्‍या दिवशी शेतकर्‍यांचे देहलीच्या सीमेवर आंदोलन

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणा आणि पंजाब राज्यांतील शेतकर्‍यांनी ‘चलो देहली’ आंदोलन चालू केले आहे; मात्र त्यांना देहलीच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. त्यामुळे या सीमेवर सैन्य छावणीचे स्वरूप आले आहे.

भदोही (उत्तरप्रदेश) येथे पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे नाकारल्याने तिला पळवून नेणार्‍या धर्मांध तरुणाला जामीन

उत्तरप्रदेश सरकार एकीकडे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा बनवत आहे, तर दुसरीकडे पोलीस त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत ! अशाने कधीतरी धर्मांधांवर वचक निर्माण होईल का ?

इंडोनेशियामध्ये बलात्कार्‍याला चाबकाचे १४६ फटके मारण्याची शिक्षा

इंडोनेशियामध्ये एका लहान मुलावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाला सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे १४६ फटके मारण्याच्या शिक्षेची कार्यवाही करण्यात आली. शरीयत कायद्यानुसार त्याला ही शिक्षा करण्यात आली.

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत !

मेहबूबा मुफ्ती यांची वर्षभरानंतर नजरकैदेतून सुटका करण्यात आल्यावर त्यांनी देशद्रोही विधाने करण्यास चालू केली होती. त्यामुळे त्यांना आजन्म नजरकैदेत ठेवण्याची आवश्यकता आहे, असे लक्षात येत होते.

तरंगत्या कॅसिनोंमधील आणखी २ कर्मचारी कोरोनाबाधित आढळले

मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंमधील आणखी २ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. २ तरंगत्या कॅसिनोंमधील प्रत्येकी १ कर्मचारी २७ नोव्हेंबर या दिवशी कोरोनाबाधित आढळला, तसेच शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्येही २७ नोव्हेंबर या दिवशी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिर बंद

कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने २७ नोव्हेंबर या दिवशी घेतला आहे. मंदिर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेतल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

३९ टक्के लाचखोरीचा दर असलेला भारत आशिया खंडातील सर्वाधिक भ्रष्ट देश !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि नैतिकता न शिकवल्याचाच हा परिणाम होय ! प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव पर्याय आहे !