जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा मुलीला नेले पळवून !
उत्तरप्रदेश सरकार एकीकडे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा बनवत आहे, तर दुसरीकडे पोलीस त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत ! अशाने कधीतरी धर्मांधांवर वचक निर्माण होईल का ?
भदोही (उत्तरप्रदेश) – येथे अल्पवयीन मुलीला शाहिद नावाच्या मुसलमान तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले होते. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आल्यावर तो जामिनावर बाहेर आला. बाहेर आल्यानंतर परत त्याने त्या मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.
शाहिद जेल से बाहर आते ही ’15 साल’ की लड़की को फिर से ले भागा, अलग-अलग धर्म के कारण मामला संवेदनशील#UPPolicehttps://t.co/bmYIKjPaSt
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 24, 2020
मुलगी अल्पवयीन असल्याचे तिच्या पालकांनी सांगूनही पोलिसांकडून ते स्वीकारले न गेल्याने त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला नाही. यामुळेच त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर आला. याचाच अपलाभ घेत त्याने या मुलीला पुन्हा पळवले. आताही त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. मुलीच्या पालकांचा आरोप आहे की, पोलीस आणि वयाची तपासणी करणारे वैद्यकीय पथक यांच्यात साटेलोटे असल्याने त्यांनी मुलीचे वय १८ ते २० वर्षे इतके सांगितले आहे.