तरंगत्या कॅसिनोंमधील आणखी २ कर्मचारी कोरोनाबाधित आढळले

पणजी – मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंमधील आणखी २ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. २ तरंगत्या कॅसिनोंमधील प्रत्येकी १ कर्मचारी २७ नोव्हेंबर या दिवशी कोरोनाबाधित आढळला, तसेच शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्येही २७ नोव्हेंबर या दिवशी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. मागील काही दिवसांत तरंगत्या कॅसिनोंमधील ३० हून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत.