मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत !

मेहबूबा मुफ्ती यांची वर्षभरानंतर नजरकैदेतून सुटका करण्यात आल्यावर त्यांनी देशद्रोही विधाने करण्यास चालू केली होती. त्यामुळे त्यांना आजन्म नजरकैदेत ठेवण्याची आवश्यकता आहे, असे लक्षात येत होते. त्यामुळे आता पोलिसांनी मेहबूबा मुफ्ती यांना आजन्मच नजरकैदेत ठेवावे !

माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना पुन्हा त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्या मुलीने प्रसारमाध्यमांना संपर्क करून दिली आहे. या दोघांनाही घरातून बाहेर पडण्यापासून रोखण्यात आले आहे. त्या पुलवामा येथे जाणार असतांना त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याविषयी मेहबूबा मुफ्ती यांनी नंतर ट्वीट करून म्हटले आहे की, मला पुन्हा अवैधरित्या कह्यात घेण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मला प्रशासन पुलवामा येथे जाण्याची अनुमती नाकारत आहे.