इंडोनेशियामध्ये बलात्कार्‍याला चाबकाचे १४६ फटके मारण्याची शिक्षा

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियामध्ये एका लहान मुलावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाला सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे १४६ फटके मारण्याच्या शिक्षेची कार्यवाही करण्यात आली.

शरीयत कायद्यानुसार त्याला ही शिक्षा करण्यात आली. या शिक्षेच्या वेळी तो बेशुद्धही झाला; मात्र शिक्षेची पूर्ण कार्यवाही करण्यात आली. जुगार, फसवणूक, मद्यपान, समलैंगिक संबंध आदी गुन्ह्यांसाठीही चाबकाचे फटके मारले जातात.