हिंदूंच्या यात्रांवर लावला जाणारा कर टाळण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! – श्री नीलमणिदास महाराज

सत्संगातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणे आवश्यक आहे. सर्वांना धर्मशिक्षण देऊन हिंदु राष्ट्रासाठी एक प्रस्ताव सिद्ध करून प्रत्येक ग्रामपंचायतीद्वारे त्याचा ठराव संमत करायला हवा आणि तो सरकारला पाठवला पाहिजे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु संस्कृती अन् धमार्र्चरण यांची आवश्यकता समाजाला पटवून देत आहेत ! – देवी श्री विद्यानंद सरस्वती

सध्या समाजात धर्मप्रसाराची पुष्कळ आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कच्छ येथील देवी श्री विद्यानंद सरस्वती (आदिशक्ति गुरु माँ) यांनी केले.

भारत हिंदु राष्ट्र होणार ! – स्वामी आनंद स्वरूप, अध्यक्ष, शंकराचार्य परिषद

येथील कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट दिल्यावर ते मार्गदर्शन करत होते.

कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना होऊ शकत नाही ! – आचार्य महामंडलेश्‍वर श्री रामकृष्णानंद महाराज

कुंभमेळा आणि मरकज यांची तुलना होऊ शकत नाही. हिंदूंच्या कुंभमेळ्याला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) प्रसारमाध्यमे आणि साम्यवादी विरोध करत आहेत, हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन श्री पंच अग्नि आखाड्याचे महामंत्री आचार्य महामंडलेश्‍वर श्री रामकृष्णानंद महाराज यांनी केले.

निवडणुकीच्या वेळी कोरोना कुठे जातो ? तो कुंभमेळ्यातच येतो का ? – श्री परमेश्‍वरदास महाराज, सिद्धपीठ शिव साई शनिधाम आश्रम, नोएडा

कोरोना महामारीचे कारण पुढे करत कुंभमेळ्यामध्ये सरकारने अनेक अडचणी आणल्या. प्रारंभी कुंभमेळा होऊच नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. साधू-महंत यांनी संघटन करून याचा विरोध केल्यावर कुंभमेळ्याला अनुमती मिळाली….

हरिद्वार कुंभमेळ्यातून आलेल्या भाविकांना १४ दिवसांचे सक्तीचे गृह अलगीकरण ! – देहली सरकारचा आदेश

देहली सरकारने ४ ते १७ एप्रिल या कालावधीत हरिद्वार कुंभमेळ्यात उपस्थित राहून परतलेल्या भाविकांना आणि साधूंना १४ दिवस सक्तीच्या गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे न करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल,

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा !

हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याविषयी महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली.

हिंदुद्वेषाचा घातक विषाणु !

हिंदुद्वेषी विषाणुवर मात करायची असेल, तर हिंदूंना संघटनरूपी लस घ्यावी लागेल. ही लस एकदा घेतली की, हिंदूंमधील प्रतिकारक्षमता रूपी एकीचे बळ वाढेल आणि मग असली घातक विषाणु आक्रमणे करण्याचा विचारही कुणी करू धजावणार नाही !

निरंजनी आखाड्याकडून हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण सांगत येथील कुंभमेळ्यात सहभागी झालेले निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी, तसेच आनंद आखाडा यांनी कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली आहे.

हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी झालेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात मध्यप्रदेशातून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.