Afzal Ansari On Mahakumbh : (म्हणे) ‘महाकुंभातील गर्दी पाहून नरक रिकामा, तर स्वर्ग हाऊसफुल्ल होईल !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

समाजवादी पक्षाचे खासदार अफझल अन्सारी यांचे संतापजनक विधान !

समाजवादी पक्षाचे खासदार अफझल अन्सारी

शादियाबाद (उत्तरप्रदेश) – संगम तीरावर स्नान केल्याने माणसाचे पाप धुऊन जातात. याचा अर्थ असा की, वैकुंठाला जाण्याचा मार्ग पुढे उघडेल. अशा परिस्थितीत गर्दी पाहून असे वाटते की, आता कुणीही नरकात रहाणार नाही आणि स्वर्ग हाऊसफुल्ल होईल, असे विधान राज्यातील गाझीपूर येथील समाजवादी पक्षाचे खासदार अफझल अन्सारी यांनी केले. ते संत रविदास जयंतीनिमित्त येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. या वेळी आमदार बेदी राम हे देखील कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.

खासदार अन्सारी रेल्वेमधील गर्दीवरून पुढे म्हटले की,

परिस्थिती अशी आहे की, लोक रेल्वेच्या खिडक्याही फोडत आहेत. यामुळे रेल्वेमध्ये बसलेल्या महिला थरथर कापत आहेत, मुलांना मांडीवर लपवून रडत आहेत. मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. ज्या लोकांनी गाड्यांची तोडफोड केली, ते १५ ते २० वयोगटातील असल्याचे मी पाहिले. आजकाल इतकी गर्दी असते की, रेल्वेमधून प्रवास करणेही असुरक्षित वाटते. तिथेही चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती पहायला मिळत आहे. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत किती लोक मृत्यूमुखी पडले कुणास ठाऊक ? आजपर्यंत मृतांचा नेमका आकडा समोर आलेला नाही. (नवी मुंबईतील खारघर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसलमानांच्या धार्मिक सभेच्या वेळी लाखो लोकांची गर्दी झाली होती. त्या वेळी दोघा मुसलमानांनी एका हिंदूची हत्या केली. अशी घटना महाकुंभमेळ्यात आलेल्या हिंदूंनी केलेली नाही. यातून कोण हिंसाचार मानसिकतेचा आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या धार्मिक कृतींवर अशा प्रकारचे विधान करणारे अन्सारी यांच्यावर उत्तरप्रदेश सरकारने गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली पाहिजे !
  • अन्सारी यांच्या धर्माच्या श्रद्धांविषयी कुणी आक्षेपार्ह विधान केले असते, तर त्याला ‘सर तन से जुदा’ची (शिरच्छेदाची) धमकी मिळाली असती किंबहुना त्यानुसार कृतीही झाली असती !