नावामधील पालट : शाहीस्नानाच्या ऐवजी अमृतस्नान !

कुंभमेळ्यात साधू संत आणि आखाडे यांच्याद्वारे केले जाणारे शाहीस्नान (अमृतस्नान), हे कुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वपूर्ण अनुष्ठानांपैकी एक आहे. आता याचे नाव पालटून ‘अमृतस्नान’ करण्यात आले आहे. ‘शाही’ शब्दाशी जोडलेला इस्लामी विवाद किंवा धर्माच्या प्रती संवेदनशीलता यांच्यामुळे हे नावामध्ये परिवर्तन करण्यात आले आहे; परंतु त्याचा उद्देश सनातन परंपरेची मूळ आध्यात्मिकता, पवित्रता आणि गौरव यांना अधिक स्पष्टतेने व्यक्त करणे, हाही आहे. अमृतस्नान हे केवळ या अनुष्ठानाचे पौराणिक महत्त्व सांगत नाही, तर तो त्याला अन्य संदर्भाला जोडण्याचा संभ्रमही समाप्त करतो.

अमृतस्नान : नाव पालटण्याचे कारण

१. ‘शाही’ शब्दाला धरून असलेला वाद : ‘शाही’ हा शब्द इस्लामी प्रभावाने प्रेरित आहे’, असा आक्षेप या शब्दाविषयी घेतला गेला. भारतीय इतिहासामध्ये मोगल आणि इस्लामी शासन यांच्या वेळी शाही शब्दाचा उपयोग व्यापक स्वरूपात होत होता. उदा. शाही दरबार, शाही फर्मान इत्यादी. आततायीपणा करणार्‍यांनी त्यांचे राज्य असतांना कुंभमेळ्याच्या आयोजनामध्ये ही अट ठेवली आणि बळजोरीने ‘शाही’ हे नाव दिले असे मानले जाते.

२. सनातन परंपरेच्या पवित्रतेला प्रकाशमान करणे : ‘अमृतस्नान’ हे नाव कुंभमेळ्याचे आयोजन सनातन धर्माच्या आध्यात्मिक आणि पौराणिक मुळाशी जोडलेले आहे, हे सुनिश्चित करते. याचा समुद्रमंथनाशी थेट संबंध असून अमृताचे थेंब पडण्याची कथा पवित्रता आणि मोक्ष यांचे प्रतीक आहे.

३. धार्मिक आणि सांस्कृतिक जागरूकता : अमृतस्नान हा शब्द हिंदु धर्मातील आध्यात्मिक ऊर्जा आणि जीवनदायिनी परंपरा यांना अधिक प्रभावीपणे व्यक्त करतो.

श्री. सुरेश चव्हाणके

अमृतस्नानाचे पौराणिक महत्त्व 

१. समुद्रमंथन आणि अमृताविषयीची कथा : पौराणिक कथांप्रमाणे देवता आणि असुर यांच्याद्वारे केल्या गेलेल्या समुद्रमंथनात अमृत उत्पन्न झाले. अमृताचे काही थेंब पृथ्वीवर प्रयागराज (त्रिवेणी संगम), हरिद्वार (गंगेचा तीर), उज्जैन (क्षिप्रा नदी) आणि नाशिक (गोदावरी नदी) या ४ स्थानांवर पडले. या स्थानांवर अमृतस्नान केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळतो आणि तिला आत्म्याची शुद्धी प्राप्त होते.

२. साधूसंतांचे नेतृत्व : अमृतस्नान साधूसंत आणि आखाड्यांची तपश्चर्या अन् धर्मरक्षण यांच्या सन्मानाचे प्रतीक आहे. हे पवित्र स्नान अमृताचे आध्यात्मिक महत्त्व आणि धर्माप्रती असलेले समर्पण दर्शवते.

३. अमृत आणि मोक्ष यांचा संबंध : अमृत याचा अर्थ अमरत्व आणि शाश्वत ऊर्जा आहे. या स्नानाला मोक्षप्राप्तीचे माध्यम मानले गेले आहे.

नाव पालटण्याचे महत्त्व : शाही ते अमृत

१. सनातन धर्माच्या मुळाशी जोडलेले : अमृतस्नान हे नाव सनातन परंपरेचा पौराणिक संदर्भ आणि आध्यात्मिक मूळ यांना योग्य प्रकारे व्यक्त करते. शाही शब्दाला इस्लामी प्रभावाशी जोडणारा वाद ‘शाही’ हे नाव समाप्त करते.

२. आध्यात्मिकतेचे प्रतीक : अमृतस्नान हे पवित्रता, शुद्धता आणि मोक्ष यांचे प्रतीक आहे. हे नाव धर्म आणि समाज यांची एकजूट करते; कारण हा शब्द कोणत्याही सांस्कृतिक किंवा धार्मिक संदर्भात विवादित नाही.

३. सांस्कृतिक जागरूकता : हे परिवर्तन भारतातील युवा वर्ग आणि आधुनिक समाजाला सनातन परंपरांची खोली अन् महत्त्व समजावण्याची एक संधी आहे.

अमृतस्नानाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

१. आध्यात्मिक महत्त्व  

१ अ. पापांचे शमन : अमृतस्नान व्यक्तीच्या जीवनातील पापांचे शमन करते आणि तिला आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेने प्रेरित करते.

१ आ. साधू संत यांची शक्ती : हे स्नान आखाडे आणि साधूसंत यांची तपश्चर्या अन् त्याग यांना मान्यता देते.

१ इ. धर्म आणि समाज यांचा संगम : अमृतस्नान समाजाला धर्माच्या दिशेने प्रेरित करून सामाजिक समरसतेला प्रोत्साहन देते.

२. वैज्ञानिक महत्त्व 

२ अ. सामूहिक चेतना निर्माण होणे : कोट्यवधी लोकांच्या सामूहिक स्नानाने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. ही ऊर्जा सामूहिक ध्यान आणि प्रार्थना यांच्या माध्यमातून मानसिक शांती आणि सामाजिक सद्भाव यांना प्रोत्साहन देते.

२ आ. आरोग्याच्या दृष्टीने होणारा लाभ : थंड पाण्याने स्नान केल्याने शरिरामध्ये ‘डोपामाईन’ आणि ‘ऑक्सिटोनिस’ यांसारखे ‘होर्माेन्स’ (संप्रेरक) सक्रीय होतात आणि आनंद अन् शांती देतात. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि शरीर उर्जेने भरून जाते.

सामाजिक आणि धार्मिक प्रभाव

१. सामाजिक समरसता : अमृतस्नान सर्व जाती, वर्ग आणि समुदाय यांना जोडते. ते व्यक्ती आणि समाज या दोन्हींना धर्म अन् परंपरा यांच्याशी जोडते.

२. धार्मिक नेतृत्व : अमृतस्नानाचे आयोजन साधूसंत आणि आखाडे यांच्या धर्मरक्षण अन् समाजसेवा या भूमिकेला अधोरेखित करते.

३. आधुनिक युगात प्रेरणादायी : अमृतस्नान आधुिनक पिढीला धर्म, संस्कृती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांविषयी प्रेरणा देते.

निष्कर्ष : अमृतस्नान ही सनातन धर्मातील अमर परंपरा

अमृतस्नान हा केवळ एक नावातील पालट नाही, तर हे सनातन धर्माची पवित्रता आणि मूल्य यांना स्पष्टपणे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न आहे. याचे आयोजन धर्म आणि समाज यांना जोडण्याचे माध्यम आहे. या लेखात ‘शाहीस्नाना’ऐवजी ‘अमृतस्नान’ या पालटाविषयीचे संदर्भ, कारण आणि त्याचे महत्त्व समाविष्ट करण्यात आले आहेत.

– डॉ. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वृत्तवाहिनी’, देहली.