Anti-Hindu Book At Mahakumbh : महाकुंभक्षेत्री ‘मानव धर्मशास्त्र’ या हिंदुद्वेषी पुस्तकातून करण्यात येत आहे हिंदूंचा बुद्धीभेद !

महाकुंभक्षेत्री पुस्तकाचे विनामूल्य वाटप !

प्रयागराज, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री त्रिवेणी मार्गावर ‘मानव धर्मशास्त्र’ या हिंदुद्वेषी पुस्तकाचे विनामूल्य वाटप करण्यात येत आहे. या पुस्तकात मंदिर, मशीद, मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) आणि पुजारी यांची एकत्र तुलना करून आणि यातून हिंदु पुजार्‍यांविषयी विसंगती माहिती देऊन हिंदूंचा बुद्धीभेद करण्यात येत आहे. या पुस्तकाचे प्रेरणास्थान म्हणून अवधूत देवीदास यांचे नाव आणि त्यांचे छायाचित्र देण्यात आले आहे. याचे लेखक लक्ष्मी नारायण असून ते बंगाल येथील आय.पी.एस्. अधिकारी आहेत, असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकाची मूळ किंमत ५०० रुपये असतांना प्रत्यक्षात मात्र महाकुंभक्षेत्री हे पुस्तक विनामूल्य वितरित करण्यात येत आहे.

‘मानव धर्मशास्त्र’ या पुस्तकात दिलेली बुद्धीभेद करणारी माहिती अशी…

१.  मंदिर, मशीद, दर्गा आदी कुणाचाही ट्रस्ट असो, त्यात समाजातील सर्व वर्गांचे प्रतिनिधित्व असले पाहिजे. पंथांच्या संस्था सर्व समाजाच्या असाव्यात तथा सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे.

२. पंथांचे महंतच स्वतःला धर्मगुरु मानतात. ते लपून छपून स्वतःच्या स्वार्थाची पूर्ती करतात. भोळे लोक त्यांच्या बोलण्याला फसतात. अशा स्थितीत परमार्थ कशा प्रकारे होईल ?

३. पुजारी दिवस-रात्र खोटी माहिती देत रहातात तथा खोटे बोलून स्वतःची उपजीविका करतात. ते धर्माला विसरून लोकांना लुबाडण्याचे काम करतात.

४. पुजारी मनुष्यात भेद निर्माण करतात. त्यामुळे संसारिक जीवनात कटुता वाढते. पुजार्‍यांकडे उपजीविका करण्यासाठी दुसरे साधन नाही. त्यामुळे ते भेदभाव करण्यासाठी विवश रहातात.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या सर्वांत मोठ्या उत्सवात हिंदूंचाच बुद्धीभेद करणार्‍या पुस्तकांची विक्री कशी केली जाते ? मक्का किंवा व्हॅटिकन चर्च येथे अनुक्रमके इस्लाम किंवा ख्रिस्ती पंथ यांच्या विरोधातील पुस्तकांची विक्री कधी होऊ शकते का ?
  • अशा पुस्तकाच्या विक्रीस अनुमती देणार्‍या आणि विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !