कुंभमेळ्यात रुग्ण सेवेसाठी ५४ रुग्णवाहिका उपलब्ध

कुंभमेळ्यात पवित्र (शाही) स्नानाच्या दिवशी आपत्कालीन सेवेत २ एम्.आय. रुग्णवाहिका, ५४ चारचाकी आणि ४० दुचाकी रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे मेळाअधिकारी डॉ. अर्जुनसिंह सेंगर यांनी दिली.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र (शाही) स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले.

हरिद्वार येथे कुंभमेळ्यामध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रथम पवित्र स्नानाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाशिवरात्रीच्या दिवशी होणार्‍या पवित्र (शाही) स्नानानिमित्त अतिरिक्त रेल्वे गाड्यांची सुविधा नाही !

यापूर्वीच्या ४ पर्व स्नानांसाठीही अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या नव्हत्या; मात्र ११ मार्चच्या पवित्र स्नानाला संत आणि संन्यासी आखाडे उपस्थित असणार आहेत. त्यामुळे अधिक गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा अहवाल दाखवणार्‍यांनाच १० ते १२ मार्च या कालावधीत कुंभमेळ्यात प्रवेश

कुंभला येणार्‍या भाविकांकडे कुंभमेळ्याची नोंदणी आणि कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी नसणार्‍यांना रेल्वेस्थानक अथवा बसस्थानक यांच्या बाहेर सोडले जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

१३ आखाडे आणि १६ मठ यांना आयकर विभागाच्या नोटिसा

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्याच्या वेळी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचा हिशोब न दिल्यावरून आयकर विभागाने १३ आखाडे आणि १६ मठ यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

येत्या ५ दिवसांत हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये योग्य जागा आणि स्थान देऊन सन्मान करा !

हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंना अशी मागणी करावी लागते, हे लज्जास्पद ! भाजपच्या राज्यात हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंवर अशी मागणी करण्याची वेळ येणे, हिंदूंना अपेक्षित नाही !

शाहीस्नानासाठीच्या अतीमहनीयांच्या पासची अनुमती रहित

वृंदावनमध्ये ‘कुंभ पूर्व वैष्णव बैठक -२०२१’च्या निमित्ताने ९ मार्च या दिवशी शाहीस्नान होणार आहे. ज्या अतीमहनीयांना यायचे असेल, तर त्यांना सामान्य नागरिक होऊन स्नान करावे लागेल.

ऋषिकेश येथे इंटरनॅशनल योग फेस्टिव्हलच्या निमित्ताने सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन

हरिद्वार ते ऋषिकेश हे कुरुक्षेत्र असल्याने एकप्रकारे कुंभक्षेत्रात या उत्पादन प्रदर्शनाद्वारे सनातनच्या धर्मप्रसाराला प्रारंभ झाला.