ऋषिकेश येथे इंटरनॅशनल योग फेस्टिव्हलच्या निमित्ताने सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन

कुंभक्षेत्रात सनातनच्या धर्मप्रसाराला आरंभ

प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू महिला

ऋषिकेश (उत्तराखंड) – येथे १ ते ७ मार्च या कालावधीत उत्तराखंड सरकारकडून ‘इंटरनॅशनल योग फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री स्वामीनारायण मंदिराच्या अन्नछत्राच्या ठिकाणी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले. हरिद्वार ते ऋषिकेश हे कुरुक्षेत्र असल्याने एकप्रकारे कुंभक्षेत्रात या उत्पादन प्रदर्शनाद्वारे सनातनच्या धर्मप्रसाराला प्रारंभ झाला. हे प्रदर्शन लागल्यानंतर त्याचा लाभ घेण्यासाठी लगेचच लोकांची त्या ठिकाणी झुंबड उडाली.

क्षणचित्र : अनेकांनी हरिद्वारमध्ये ‘ही उत्पादने उपलब्ध आहेत का ?’, अशी विचारणा केली. तसेच ‘ही उत्पादने मिळण्यासाठी कुणाला संपर्क करायचा ?’, असे जिज्ञासेने विचारले.