हरिद्वारमधील हरिपूर कला येथील रस्त्यांसह सप्त सरोवर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांमध्ये संताप !

कुंभसारख्या मोठ्या सोहळ्याची उत्तराखंड प्रशासनाने कशा प्रकारे सिद्धता केली आहे, हेच यातून दिसून येते. आता सरकारने यात हस्तक्षेप करून प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलक प्रदर्शनामुळे लाखो भाविकांपर्यंत धर्मरक्षणाचा विषय पोचेल ! – पू. आशिष गौतम

समितीचे धर्मशिक्षण, राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीचे कार्य ऐकून पू. आशिष गौतम यांनी कुंभपर्वात त्यांच्या आश्रमामध्ये होणार्‍या कार्यक्रमात समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक आहेत. या आश्रमामध्ये वेदपाठशाळा, यज्ञशाळा आणि अन्नछत्र चालवले जाते.

बैरागी कॅम्पमधील सर्व आखाड्यांना ७ दिवसांत सर्व सुविधा देणार ! – दीपक रावत, कुंभमेळा अधिकारी

हिंदूंच्या कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना किमान पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी साधूसंतांना प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत असेल, तर असे प्रशासन काय कामाचे ? अन्य धर्मियांविषयी प्रशासनाने अशी उदासीनता दाखवली असती का ?

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘कुंभमेळा पेज’चे श्री १००८ महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज यांच्या हस्ते लोकार्पण !

सध्या जे भाविक कुंभमेळ्याला येऊ शकत नाहीत, त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील कुंभमेळा पानाद्वारे माहिती मिळणार आहे.

कुंभमेळ्यासाठी बनवलेली १ सहस्र शौचालये आगीत जळून खाक; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

१० मार्चला यातील एका शौचालयाला अचानक आग लागली आणि सर्व शौचालये जळली.

हरिद्वार कुंभमेळ्याला जाण्यासाठीची अनिवार्य असलेली नोंदणी रहित !

कोरोनाच्या संकटामुळे खबरदारी म्हणून बनवलेले कुंभमेळ्यासाठीचे अन्य सर्व नियम आपसूक रहित होणार

हिंदु जनजागृती समितीचे आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य काळानुरूप ! – पूज्य श्री तारा मां

हिंदु जनजागृती समितीचे चालू असलेले आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य उत्तम असून ते काळानुसार आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले.

कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर उत्तराखंड सरकारकडून हरिद्वार येथील सर्व पशूवधगृहांचे परवाने रहित

उत्तराखंड सरकारने येथे होणार्‍या कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील सर्व पशूवधगृहांचे परवाने रहित केले आहेत.

मोक्षपुरी हरिद्वार : स्थानमहात्म्य !

मनुष्यजन्माचे सार्थक मोक्षप्राप्तीतच आहे आणि त्यासाठी काय करावे, याचा मार्ग सांगणार्‍या हिंदु धर्माने अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांचीपूरम्, अवंतिका (उज्जैन), द्वारिकापुरी या ७ मोक्षदायी नगरी सांगितल्या आहेत.