त्रिशूर (केरळ) येथील श्रीकृष्ण मंदिरात धार्मिक विधींसाठी यांत्रिक हत्तींचा वापर करण्यात येणार !

त्रिशूर येथील इरिंजादापल्ली श्रीकृष्ण मंदिरात आता धार्मिक विधी करण्यासाठी हत्तींऐवजी यांत्रिक हत्ती वापरण्यात येणार आहे. या हत्तीची उंची साडे दहा फूट असून त्याचे एकूण वजन ८०० किलो आहे. या हत्तीवर ४ जण स्वार होऊ शकतात. या हत्तीची सोंड, डोके, डोळे आणि कान सर्व विजेवर चालतात.  

(म्हणे) ‘मी माझ्या मतदारसंघातील जुनी ३ मंदिरे पाडली होती !’ – द्रमुकचे नेते टी.आर्. बालू

मंदिरे पाडल्याची गोष्ट अभिमानाने सांगणार्‍या अशा आताच्या गझनींना त्यांची जागा दाखवण्यासाठी तमिळनाडूतील हिंदूंनी संघटिन होणे आवश्यक !

केरळ येथील धार्मिक स्थळे आणि प्राचीन मंदिरे यांविषयी तेथील सरकार अन् स्थानिक लोक यांची हिंदु धर्माविषयी लक्षात आलेली उदासीनता !

‘केरळ दौर्‍यामध्ये आध्यात्मिकदृष्टीने चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या साधकांना तेथील सरकार आणि स्थानिक लोक यांची हिंदु धर्माविषयी लक्षात आलेली दयनीय स्थिती येथे दिली आहे.

केरळमधील ख्रिस्‍ती अभिनेत्रीला शिवमंदिरात प्रवेश नाकारला !

मंदिरांतील कथित धार्मिक भेदभावाविषयी बोलणारे अन्‍य धर्मियांकडून केल्‍या जाणार्‍या भेदभावाविषयी मात्र बोलण्‍यास टाळतात ! प्रत्‍येक मंदिराचे नियम आहेत. त्‍यामागे भेदभाव नसून त्‍यामागे हिंदु धर्मशास्‍त्र आहे. याचा अभ्‍यास न करता ‘धार्मिक भेदभाव आहे’, असा कांगावा करत समान वागणुकीची मानसिक स्‍तरावरील मागणी करणे हास्‍यास्‍पद आहे !

यात्रेकरूंना हिंसकपणे ढकलणार्‍या शबरीमला मंदिराच्‍या सुरक्षारक्षकावर कारवाई व्‍हावी ! – केरळ उच्‍च न्‍यायालय

यावरून सुरक्षारक्षकांनाही धर्मशिक्षण देणे का आवश्‍यक आहे ?, हे लक्षात येते !

केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिराकडे १ सहस्र ७३७ कोटी रुपयांच्या ठेवी ! – माहितीच्या अधिकारात तपशील उघड

त्रिसूर येथील गुरुवायूरमधील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिराकडे १ सहस्र ७३७ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि २७१.०५ एकर भूमी आहे, ‘माहिती अधिकारा’त मागवलेल्या उत्तरात ही माहिती मिळाली आहे.

केरळमधील एका मंदिरात ‘इफ्तार’चे आयोजन !

‘हिंदु-मुसलमान एकता’ हे मृगजळासमान असल्याचा इतिहास असतांना  मंदिराचे अध्यक्ष कोणत्या जगात वावरत आहेत ? धार्मिक सलोख्याचा ठेका केवळ हिंदूंनी घेतलेला नाही, हे या अध्यक्ष महाशयांना कोण सांगेल ?

केरळमधील श्री षण्गुमुगम्देवी मंदिरातील देवीच्या दागिन्यांची देवस्वम् मंडळाच्या अधिकार्‍यांकडूनच चोरी !  

मंदिराचे सरकारीकरण झाल्यामुळेच देवस्वम् मंडळात भ्रष्ट अधिकार्‍यांचा समावेश होतो. हे टाळण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्या !

शबरीमला मंदिराच्या प्रसादासाठी ‘हलाल’ गुळाचा वापर करत आल्याची ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ची स्वीकृती

हिंदूंच्या मंदिरातील प्रसादासाठी ‘हलाल’ गुळाचा वापर का ? हा तर हिंदुद्रोह असून भक्तांचा विश्‍वासघातच ! यासाठी हिंदू आणि त्यांच्या संघटनानी पुढाकार घेतला पाहिजे !

शबरीमला मंदिराच्या प्रसादातील ‘हलाल गुळा’चा वापर रोखण्यासाठी न्यायालयात याचिका

‘अरावणा’ आणि ‘उन्नियप्पम्’ या प्रसादांचे वाटप तात्काळ रोखावे आणि यापुढे नैवैद्य अन् प्रसाद बनवण्यासाठी या गुळाचा वापर करण्यात येऊ नये, असा आदेश ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’ अन् अन्न सुरक्षा आयुक्त यांना देण्याची याचिकेद्वारे मागणी !