धार्मिक भेदभाव कायम असल्याचे सांगत अभिनेत्रीचा थयथयाट !
एर्नाकुलम् (केरळ) – एर्नाकुलम् येथील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात ख्रिस्ती अभिनेत्री अमला पॉल हिला प्रवेश नाकारला गेला. मंदिर प्रशासनाने प्रथेचा संदर्भ देत मंदिराच्या आवारात केवळ हिंदूंना अनुमती असल्याचे सांगितले. हे मंदिर पुरातन असून यात महादेव मंदिराच्या आवारात देवी पार्वतीचे स्वतंत्र मंदिर आहे. शिवमंदिर वर्षाचे १२ मास उघडे असते; मात्र देवी पार्वतीचे मंदिर वर्षातून केवळ १२ दिवस उघडे असते.
अमला हिने मंदिरासमोरील रस्त्यावरून देवीचे मुखदर्शन घेतले आणि ती निघून गेली. जातांना तिने मंदिराच्या दर्शन घेणार्यांच्या नोंदवहीत लिहिले, ‘हे फार दुःखद आणि निराशाजनक आहे की, वर्ष २०२३ मध्येही अजून धार्मिक भेदभाव अस्तित्वात आहे. मी देवीच्या जवळ जाऊ शकले नाही; पण दूरून दर्शन घेऊनही तिचे अस्तित्व मला जाणवले. मला आशा आहे की, धार्मिक भेदभावात लवकरच पालट होईल आणि एक दिवस अशी वेळ येईल की, धर्माच्या आधारावर नव्हे, तर सर्वांनाच समान वागणूक दिली जाईल.’
मंदिराच्या न्यासाचे सचिव प्रसून कुमार यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, आतापर्यंत अनेक धर्मातील अनेक भाविक मंदिरात दर्शनासाठी आले आहेत; परंतु याविषयी कुणाला काही ठाऊक नाही; मात्र एखादी वलयांकित व्यक्ती आली की, ती वादग्रस्त ठरते.
संपादकीय भूमिका
|