केरळ येथील थिरूमंधमकुन्नू भगवती मंदिराच्या समितीवर मुसलमानांच्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयात याचिका !

थिरूवनंथपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने राज्यातील मलप्पूरमच्या अंगदिपूरम येथे असलेल्या सुप्रसिद्ध थिरुमंधमकुन्नू भगवती मंदिराच्या संदर्भात प्रविष्ट केलेली याचिका स्वीकारली आहे. मंदिराच्या महोत्सवासाठी बनवण्यात आलेल्या ‘पूरम आयोजन समिती’च्या महत्त्वपूर्ण पदांवर मुसलमानांच्या नियुक्तीला आव्हान देणारी ही याचिका ‘हिंदू ऐक्य वेदी’ने प्रविष्ट केली आहे. मंदिराचा महोत्सव २८ मार्चपासून ७ एप्रिल या कालावधीत असणार आहे.

१. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’चे खासदार अब्दुस्समद समदानी हे या समितीचे मुख्य संरक्षक असून समितीचे अध्यक्ष हे लीगचेच आमदार मंजलमकुजी अली आहेत.

२. ‘वर्डिक्टम्’ या कायदेविषयक माहिती प्रसारित करणार्‍या संकेतस्थळानुसार ‘हिंदू एक्य वेदी’चे सचिव पी.व्ही. मुरलीधरन् यांनी म्हटले की, उत्सव समितीची स्थापना देवस्वम बोर्डाच्या नियमांच्या विरोधात करण्यात आली आहे. बोर्डानुसार समितीच्या महत्त्वपूर्ण पदांवर केवळ हिंदूंचीच नियुक्ती करता येऊ शकते.

संपादकीय भूमिका

  • मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्या प्रार्थनास्थळांवर कधी कुणा हिंदूची नियुक्ती झाल्याचे ऐकिवात आहे का ? मुळात हिंदूंच्या धर्माभिमानशून्यतेमुळेच अशा घटना घडतात, हे जाणा !
  • साम्यवादी सरकारच्या देवस्वम् बोर्डाच्या कह्यात असणार्‍या मंदिरांमध्ये असे प्रकार घडल्यास आश्‍चर्य ते काय ? हिंदु धर्माच्या मुळावर उठलेल्या साम्यवाद्यांचा वैचारिक पराभव करण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !