केरळ राज्यातील मंदिरात उत्सवांच्या वेळी अन्नदानाच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे

‘केरळ राज्यामध्ये मंदिरात ७ – ८ दिवस उत्सव साजरे केले जातात. मंदिरात उत्सवाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किंवा काही मंदिरात शेवटच्या दिवशी अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते. त्या कालावधीत मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(प्रतिकात्मक चित्र)

१. मंदिरातील अन्नदानाच्या वेळी लोकांनी केवळ जेवण मिळावे; म्हणून गर्दी करणे

अ. केवळ अन्नदानाच्या वेळी लोकांची गर्दी अकस्मात वाढते.
आ. बरेच लोक मंदिरात देवाचे दर्शन न घेता थेट जेवायलाच जातात.
इ. घरातील प्रत्येक सदस्यच मंदिरात जेवणासाठी येतो.
ई. ‘मंदिरातील प्रसाद ग्रहण करायला आलो आहे’, असा भाव नसल्याने त्यांना प्रसादातील चैतन्याचा लाभ होत नाही.
उ. एका मंदिरातील विश्वस्त आसपासच्या अहिंदूंनाही जेवणासाठी बोलवतात. धर्मांधही मंदिरात जेवणासाठी येतात.

कु. अदिती सुखठणकर

२. अन्न वाढण्याची अयोग्य पद्धत

अ. जेवण वाढतांना ते पुष्कळ प्रमाणात भूमीवर पडून वाया जाते. तसेच अन्न पायाखाली तुडवले गेल्याने त्याचा अवमान होतो.
आ. जेवण वाढतांना जेवणारी व्यक्ती लहान कि मोठी आहे, याचा विचार केला जात नाही. अगदी लहान मुलांनाही मोठ्यांना वाढतो, एवढे अन्न वाढले जाते. त्यामुळे त्यातील ९५ टक्के अन्न वाया जाते.
इ. मोठी माणसेही त्यांना वाढलेले सर्व अन्न संपवत नाहीत. त्यामुळे पुष्कळ अन्न वाया जाते.
ई. अन्नग्रहण करण्यापूर्वी कुणीही प्रार्थना करत नाही.

‘मंदिरातील अन्न हे देवतेचा प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास आपल्याला चैतन्य आणि देवतेचा आशीर्वाद मिळतो’, असा भाव ठेवून अन्न ग्रहण केल्यावर लाभ होतो; पण धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हा भाग तर दूरच, तसेच अन्न वाया घालवून त्याचे आपण स्वतःला पाप लावून घेत असतो. त्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता किती आहे ? हे लक्षात येते.’

– कु. अदिती सुखठणकर, केरळ (एप्रिल २०२३)

साधक, धर्मप्रेमी आणि वाचक यांना विनंती

या लेखात म्हटल्याप्रमाणे मंदिरांसंबंधी कुणाला अशा प्रकारचे काही कटू अनुभव आले असल्यास त्यांनी नजीकच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात पाठवावेत, ही विनंती !