पाकच्या विरोधात लढणार्‍या गटाने केलेल्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार

पाकच्या सिंध, बलुचिस्तान, वजीरिस्तान, खैबर पख्तुनख्वा आदी प्रांतांमध्ये पाकच्या विरोधात लोकांकडून उठाव होत आहे. त्याचा परिणाम म्हणून पाकचे ६ तुकडे झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

चीनमध्ये बीबीसीवर बंदी !

चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे, ‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’ने प्रसारणाच्या संदर्भातील निर्देशांचे उल्लंघन केले आहे.

जागतिक शक्ती’ म्हणून भारताच्या उदयाचे आम्ही स्वागत करतो ! – अमेरिका

अमेरिकेने म्हटले म्हणजे भारत ‘जागतिक शक्ती’ झाला, असे होत नाही, तर प्रत्यक्षात भारताने तो पल्ला गाठणे महत्त्वाचे !

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद यांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल ! – बिल गेट्स यांची चेतावणी

अनेक संत, महात्मे आणि भविष्यवेत्ते येणार्‍या भयाण काळाविषयी सांगत आहेत. त्यामुळे आतातरी समाजाने सतर्क होऊन येणार्‍या संकटकाळातून तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !

चीनकडून एका बाजूला चर्चा आणि दुसर्‍या बाजूला मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि युद्धसाहित्य तैनात !

चीन विश्‍वासघातकी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने त्याच्या कोणत्याही डावपेचाला बळी न पडता त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी नेहमीच सिद्ध रहावे आणि संधी मिळाल्यास त्याच्यावर आक्रमण करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ?

गेल्या काही वर्षांपासून देशात जो तो उठतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची आरोळी ठोकतो. अशी आवई उठवणार्‍यांवर सरकारने वेळीच कारवाई करायला हवी. अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रपोगंडा देशहितासाठी बाधक ठरू शकतो !

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरांची स्थिती अत्यंत दयनीय !  

याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडणार नाहीत; मात्र भारतातील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवर दगड भिरकावण्यात आल्याची अफवा जरी पसरली, तरी हिंदूंना लगेच ‘तालिबानी’, ‘असहिष्णु’ ठरवून ते मोकळे होतात !

न्यूयॉर्क विधानसभेकडून ‘५ फेब्रुवारी’ हा ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित

पाक साजरा करत असलेल्या ‘काश्मीर एकता दिवसा’च्या पार्श्‍वभूमीवर न्यूयॉर्क विधानसभेची भारतविरोधी कृती ! भारताने केवळ पोकळ निषेध नोंदवण्याऐवजी अमेरिकाला समजेल आणि ती माघार घेईल, अशा भाषेत तिला फटकारले पाहिजे !

शी जिनपिंग यांना लोकशाही ठाऊक नाही ! – जो बायडेन यांनी फटकारले

एक लोकशाहीप्रधान देशाचे नेतृत्व कसे करायचे याचे गुण जिनपिंग यांच्यात नाहीत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिनपिंग यांना फटकारले.

चीनमध्ये उघूर मुसलमान महिलांवर होत आहेत सामूहिक बलात्कार ! 

एरव्ही जगात कुठेही जरी इस्लामच्या विरोधात काही झाले, तर इस्लाम खतरे में हैची आरोळी ठोकणारे चीनमध्ये त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांवर मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !