भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद यांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल ! – बिल गेट्स यांची चेतावणी

अनेक संत, महात्मे आणि भविष्यवेत्ते येणार्‍या भयाण काळाविषयी सांगत आहेत. त्यामुळे आतातरी समाजाने सतर्क होऊन येणार्‍या संकटकाळातून तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !

बिल गेट्स

नवी देहली – भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद या २ गोष्टींमुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होईल. जगाला संपवण्याच्या उद्देशाने कुणीही नवीन विषाणूची निर्मिती करू शकतो. सध्या जगभरामध्ये चर्चा असणार्‍या कोरोना विषाणूपेक्षा या २ गोष्टींमुळे जगभरामध्ये हाहाःकार उडेल, अशी भविष्यवाणी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी केली आहे. ते यू ट्यूब वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. ५-६ वर्षांपूर्वी बिल गेट्स यांनी कोरोनासारख्या साथीचे संक्रमण होण्याची भविष्यवाणी केली होती. त्यामुळेच आता गेट्स यांनी पुन्हा नव्याने भविष्यवाणी केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

बिल गेट्स पुढे म्हणाले की, कोणत्याही साथीच्या रोगाला जगभरामध्ये पसरवण्यापासून थांबवता येणार नाही. आपण केवळ अशा संकटांचा सामना करण्यासाठी आधीपासून सिद्ध रहाणे हा एकमेव मार्ग आहे. श्‍वसनाशी संबंधित विषाणू हे अतिशय धोकादायक असतात. असे विषाणू काही ठराविक काळानंतर संक्रमित होऊन पसरत असतात. अनेकदा यांपैकी अनेक विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतरही काही विशेष फरक दिसून न आल्याने त्याविषयी समजत नाही; मात्र त्याच वेळी इबोलासारख्या आजारामध्ये व्यक्तीला थेट रुग्णालयात भरती करावे लागते.

 (सौजन्य : Veritasium)

I Asked Bill Gates What’s The Next Crisis?


GatesNotes : The year global health went local