जागतिक आरोग्य संघटनेच्या मानचित्रात (नकाशात) जम्मू-काश्मीर आणि  लडाख भारतापासून वेगळे !

लंडनधील भारतीय असलेल्या पंकज यांच्या निदर्शनास ही गोष्ट सर्वप्रथम आली. ‘यामागे चीनचा हात असू शकेल; कारण चीनकडून जागतिक आरोग्य संघटनेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य केले जाते’, असा दावा पंकज यांनी केला आहे.

विकिपीडियाकडून भारताच्या मानचित्रातील ‘अक्साई चीन’ला चीनमध्ये दाखवले !

‘विकिपीडिया’ या संकेतस्थळावरील भारताच्या मानचित्रामध्ये अक्साई चीनला चीनच्या मानचित्रात दाखवल्याने भारत सरकारने आक्षेप घेत हे मानचित्र हटवण्याचा आदेश दिला आहे.

लडाख चीनचा भूभाग असल्याचा नकाशा दाखवणार्‍या ट्विटरची क्षमायाचना

ट्विटरने त्याच्या मानचित्रामध्ये लडाखला चीनचा भूभाग दाखवला होता. या प्रकरणी भारताच्या संसदीय समितीने नोटीस बजावून क्षमा मागण्यास सांगितले होते. त्यानंतर ट्विटरने समितीसमोर लेखी क्षमायाचना केली आहे.