(म्हणे) ‘भारताने शांत रहावे आणि यावर अधिक बोलणे टाळावे ! – चीन

चीनच्या नव्या मानचित्राला (नकाशाला) केलेल्या विरोधावरून उद्दाम चीनचा भारताला सल्ला !

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन

नवी देहली – चीनने नुकत्याच प्रसारित केलेल्या त्याच्या नव्या मानचित्रात भारताचे अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश त्याचे भाग असल्याचे दाखवल्यावर भारताने यास विरोध केला. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी, ‘ही चीनची जुनी सवय आहे. त्याच्या दाव्याला काही अर्थ नाही’, असे म्हटले होते. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले की, आम्ही आमच्या मानचित्राची वर्ष २०२३ ची आवृत्ती प्रसारित करणे, ही सामान्य प्रक्रिया आहे. चीनचे सार्वभौमत्व आणि अखंडता लक्षात घेऊन हे मानचित्र प्रसारित केले आहे. हा भाग कायदेशीररित्या आमचा आहे. आम्हाला आशा आहे की, संबंधित पक्ष (भारत) या विषयावर शांत रहातील आणि त्यावर अधिक बोलणे टाळतील.

संपादकीय भूमिका

भारताने काय करावे आणि काय करू नये ?, हे चीनने सांगू नये ! अशा उद्दाम चीनला केवळ शब्दांची भाषा कळणार नाही, हेच यातून लक्षात येते !