भारतानंतर आता चीनला मलेशिया, फिलिपिन्स, तैवान आणि नेपाळ यांचा विरोध

चीनने त्याच्या मानचित्रात (नकाशात) अरुणाचल प्रदेश, दक्षिण चीनी समुद्र आदींचा समावेश केल्याचे प्रकरण !

काठमांडू (नेपाळ) – चीनने त्याच्या मानचित्रात अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, दक्षिण चीनी समुद्र आदी भागांना स्वतःचे म्हणून दाखवल्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी त्याला विरोध दर्शवतांना ‘दुसर्‍याचे क्षेत्र स्वतःचे सांगण्याचीही चीनची जुनी सवय आहे’, असे म्हटले होते. यापाठोपाठ आता मलेशिया, फिलिपिन्स, तैवान आणि नेपाळ या ४ देशांनीही चीनच्या नव्या नकाशाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

चीनने त्याच्या या नव्या मानचित्रात संपूर्ण दक्षिण चीनी समुद्र चीनचा प्रदेश असल्याचे दाखवले आहे. हे मानचित्र मलेशियाने नाकारले आहे. फिलिपिन्स आणि तैवान यांनही नव्या मानचित्रावरून चीनवर जोरदार टीका केली आहे. चीनच्या या कृत्यामुळे संतप्त झालेले नेपाळची राजधानी काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी चीनचा दौरा रहित केला आहे.