दुसर्‍याचे क्षेत्र आपले सांगण्याची चीनची जुनी सवय !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी नव्या मानचित्रावरून चीनला सुनावले !

एन्.डी.टी.व्ही. वृत्तवाहिनीला मुलाखत देताना परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर (उजवीकडे)

नवी देहली – चीनने त्याच्या मानचित्रात (नकाशात) अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन यांना त्याचा प्रदेश म्हणून दाखवल्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘दुसर्‍याचे क्षेत्र आपले सांगण्याचीही चीनची जुनी सवय आहे’, असे म्हटले आहे.

एन्.डी.टी.व्ही. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर म्हणाले की, चीनने मानचित्रात जी क्षेत्रे स्वतःची म्हणून दाखवली आहेत, ती त्याची नाहीत. असे करण्याची चीनची जुनी सवय आहे. अक्साई चीन आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. यापूर्वीही चीनने भारताच्या काही भागांचे मानचित्र काढले आहे. त्याच्या दाव्याने काहीही होत नाही. आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. दुसर्‍याची क्षेत्रे स्वतःची होतील, असे निरुपयोगी दावे करून काहीही होत नाही.