|
मुंबई – ठाणे पोलिसांनी ‘गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्ती समिती’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. समितीने शहरात लावलेल्या एका भित्तीपत्रकामध्ये भारताच्या मानचिन्हातून (नकाशातून) पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे जाणूूनबुजून वगळले होते. हे दोन्ही प्रदेश म्हणजे भारताचा अविभाज्य भाग आहे. ही घटना रविवारी ५ जानेवारी या दिवशी घडली. या प्रकरणी समितीच्या सदस्यांनी जाणूनबुजून भारताचा अवमान केला आहे. भारताच्या फाळणीसाठी चिथावणीखोर प्रकार केला आहे. यामुळे एकतेला धोका निर्माण होईल, असे या तक्रारीत म्हटले आहे.
Pakistan-Occupied Kashmir and Aksai Chin Omitted from Emblem on Poster!
📍Thane Maharashtra
– Complaint Filed Against ‘Gareeb Nawaz Moinuddin Chishti Committee for Inciting Partition of India through Provocative Actions
– The complaint accuses the committee of deliberately… pic.twitter.com/fcoNWsv0sF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2025
१. नवाज मोईनुद्दी चिश्ती यांना ‘हिंदुस्थानचा राजा’ असल्याचे भित्तीपत्रकामध्ये म्हटले होते. त्यावर मशिदीचे चित्र असून त्यावर भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे दिसून येते.
२. चिश्ती समितीने ‘सरकार गरीब नवाज’ आणि ‘सरकार मुलान वाले बाबा’ यांच्या उरूसानिमित्त (मुसलमानांच्या कार्यक्रमानिमित्त) हे भित्तीपत्र लावले होते.
संपादकीय भूमिकामानचिन्हाच्या माध्यमातून मुद्दामहून भारताचा अवमान करणार्यांवर तातडीने कठोर कारवाई करायला हवी ! अशा भारतद्वेष्ट्या समितीवर बंदी का घातली जाऊ नये ? |