लोकांना प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मण सवदी यांचे वक्तव्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

(म्हणे), ‘मुंबई कर्नाटकची असून त्यावर आमचा अधिकार आहे !’ – लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री, कर्नाटक

एस्.टी. रस्त्यावर अडवून सरकारी कर्मचार्‍यांना शिवीगाळ आणि दमदाटी करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – समस्त हिंदुत्ववादी संघटना

सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे मुजोर धर्मांध ! अशी मागणी का करावी लागते ?

रेल्वे पुलाच्या ठिकाणी अवैधपणे माती उत्खनन करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा ! – विशाल पवार

सांगली-कोल्हापूर या मार्गावरील एका नदीपात्रात खांब उभारण्यात येत आहे. हे बांधकाम चालू असतांना नदीपात्रातून कोणाचीही अनुमती न घेता मोठ्या प्रमाणात माती काढण्यात येत आहे.

आंदोलनाची वेळ अण्णांवर येणार नाही ! – माजी मंत्री गिरीश महाजन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या ३० जानेवारीपासून कृषी मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत.

राजकारण्यांच्या कार्यक्रमांवर गुन्हे नोंद नाहीत; मात्र सामान्य माणसांवर का ? – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ट्रॅक्टर मोर्चा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्यातील सोनित सिसोलेकर प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने सन्मानीत

सोनित सिसोलेकर याने नासाच्या एका स्पर्धेत मंगळ ग्रहावरील माती लाल का झाली ?, यासंबंधी संशोधन सादर केले.

कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जोपर्यंत हे प्रकरण न्यायालयात आहे, तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जाऊ नये ? जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत आपल्या सरकारने हा भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी न्यायालयात केली पाहिजे.

तांडव वेब सिरीजवर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा ! – हिंदु राष्ट्र सेनेची मागणी

हिंदूंच्या देवतांचा अवमान करून धर्मभावना दुखावणार्‍या आणि जातीय द्वेष पसरवणार्‍या तांडव वेब सिरीज वर तात्काळ बंदी आणावी, तसेच सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र सेनेने निवेदनाद्वारे केली आहे.

नागपूर येथे ३ लाख रुपये लाचेची मागणी केल्याच्या प्रकरणी साहाय्यक आयुक्तांना अटक

९ लाख रुपयांचे देयक संमत करण्यासाठी राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयातील साहाय्यक आयुक्तांनी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक त्यांना केली आहे.

भारतात आल्यावर स्वर्गात आल्याचा अनुभव आला ! – हसीना दिलशाद अहमद

पाकिस्तानात भारतीय मुसलमानांचाही छळ केला जातो.