तांडव वेब सिरीजवर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा ! – हिंदु राष्ट्र सेनेची मागणी

तहसीलदारांना निवेदन देतांना हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते

तळोदा (नंदुरबार) – हिंदूंच्या देवतांचा अवमान करून धर्मभावना दुखावणार्‍या आणि जातीय द्वेष पसरवणार्‍या तांडव वेब सिरीज वर तात्काळ बंदी आणावी, तसेच सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र सेनेने २५ जानेवारी या दिवशी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अमन जोहरी, उपजिल्हाध्यक्ष पारस परदेशी, सचिव राहुल जैन, किरण ठाकरे, शरद राठोड, योगेश चव्हाण, सौरभ कलाल, हितेश तांबोळी, महेश बोरसे आणि प्रसाद पाठक उपस्थित होते.