नाशिक येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव करावा !- सावरकरप्रेमी

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, कादंबरीकार असून त्यांनी अद्वितीय कामगिरी केली आहे.

अंबरनाथ-बदलापूर स्थानकांच्या दरम्यान रेल्वेरूळ दुरुस्त करणारे यंत्र रुळावरून घसरले, १ ठार २ जण घायाळ

मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत

कोळसा खाणींमुळे वणी ताक्यातील शेती व्यवसायाची पुष्कळ हानी

परिसरातील कोळसा खाणींमुळे प्रदूषणात झालेली वाढ, कृत्रिम टेकड्या आणि जंगले यांमुळे शेती व्यवसायाची पुष्कळ हानी झाली आहे. अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे खाण प्रशासन उद्दाम झाले आहे. प्रदूषणामुळे उत्पन्न अल्प झाले आहे.

जुन्नर (पुणे) येथील देशी कुक्कुटपालन फार्ममधील २०० कोंबड्या अज्ञात आजाराने मृत

सध्या राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाची स्थिती असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग निदान प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा ! – हिंदु जनजागृती समिती

तिरंगा मास्क किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज हे देशप्रमाचे प्रदर्शन करण्याचे माध्यम नाही. उलट ध्वजसंहितेनुसार अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा वापर करणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे आणि हे राष्ट्रगौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ चे उल्लंघन आहे.

लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक केलेले अधिकारी सुरेश रेड्डी यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

बक्षीस पत्राचा सिटी सर्व्हेचा उतारा देण्यासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी नगरभूपान अधिकारी सुरेश रेड्डी यांना २५ जानेवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांच्या मागणीनुसार कमानवेस येथे महापालिकेच्या गाड्या लावण्यासाठी वाहतनळ 

महापालिकेने या कचरा गाड्यांसाठी कमानवेस येथे वाहनतळ उभारण्याचे काम चालू केले आहे. त्वरित काम चालू केल्याविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांनी आयुक्तांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे.

ओबीसींची जातीनिहाय जनगणना हवी ! – पंकजा मुंडे, नेत्या, भाजप

धनंजय मुंडे प्रकरण संवेदनशील असल्याने त्याचे मी राजकीय भांडवल करणार नाही !

सिंधुदुर्गात होणारी गुटखा विक्री तात्काळ बंद करण्याची शासनाकडे मागणी

गुटखा विक्री व्यवसाय तात्काळ बंद करावा अन्यथा राज्य सरकारने २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनापासून सिंधुदुर्ग जिल्हा गुटखा विक्री केंद्र म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी महालक्ष्मी दिव्यांग आणि निराधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.

शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडले नसल्यास १ फेब्रुवारीपासून होणार रेशन बंद !

शिधापत्रिकेला आधार कार्ड क्रमांक जोडला (लिंक) नसल्यास १ फेब्रुवारीपासून रेशन बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते आणि तहसीलदार आशा होळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.