परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींना सृष्टीची उत्पत्ती, विश्‍वाची रचना, सप्तलोक, सप्तपाताळ, मंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादींच्या संदर्भात कळले, ते आधुनिक वैज्ञानिकांना अजूनही कणभरही कळत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने ठिकाठिकाणी शिवप्रतापाचा जागर !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष ७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केला. याला २१ डिसेंबर या दिवशी ३५२ वर्षे पूर्ण झाली. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून ओळखला जातो. या दिनाच्या निमित्ताने शिवप्रेमींनी ठिकठिकाणी शिवप्रतापाचा जागर केला.

(म्हणे) ‘मोदी त्यांच्या पत्नीसमवेत ५ दिवसही राहिले नसल्याने ते देशावर शासन करण्यास असमर्थ !’ – तमिळनाडूतील ख्रिस्ती बिशप एजरा सरगुनम यांची अश्‍लाघ्य टीका

असे पाद्री चर्चमध्ये असतील, तर ते समाजाला कशा प्रकारचे मार्गदर्शन करत असतील, हे लक्षात येते ! याविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड उघडतील का ?

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचे धर्मकार्य

वारकरी संप्रदायातील पितामह, परखड वक्ते, धर्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु धर्मभूषण, धर्मभास्कर, साधकांचे मायबाप, महाराष्ट्र्रातील सर्व वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेले श्री गुरु ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते  यांनी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी म्हणजे २१ डिसेंबर या दिवशी देह ठेवला. त्यांच्या चरणी शतशः नमन !

हिंदुत्वाचा आधारवड हरपला !

धर्मतेजाने हिंदु समाजाला असलेले धर्माविषयीचे अज्ञान दूर करणार्‍या या महान संत विभूतीच्या जाण्याने हिंदु समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे; देहाने जरी अस्तित्वात नसले, तरी निर्गुणातून त्यांचे कार्य चालूच रहाणार. धर्मरक्षणार्थ झटण्यासाठी त्यांनी धर्मप्रेमींना बळ आणि आशीर्वाद द्यावेत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !

गर्भारपणाचा बाजार !

सध्या गर्भवती असलेल्या अभिनेत्रींची छायाचित्रे सामाजिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होण्याची नवरूढी निर्माण झाली आहे. प्रसिद्धीमाध्यमेही त्याला बिनधोक प्रसिद्धी देऊन त्यांच्यातील स्पर्धा सांभाळत असतात.

सातारा येथील शिवतीर्थावर ३५२ वा ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात साजरा

शिवतीर्थावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून पूजन करण्यात आले.

अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद परमहंस भालचंद्र महाराज

भक्तांना दर्शन होताच त्यांच्या मनोकामना पूर्ण करणार्‍या परमहंस भालचंद्रबाबांचा ४३ वा पुण्यतिथी सोहळा २१ डिसेंबर २०२० ला कणकवली नगरीत साजरा होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी वाहिलेली शब्द सुमनांजली…

कोरगाव (पेडणे) येथील श्री भूमिकादेवीचा आज जत्रोत्सव

पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील श्री भूमिकादेवीचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमी (२१.१२.२०२०) या दिवशी साजरा होत आहे. याविषयीची उपलब्ध माहिती येथे देत आहोत.

परमहंस भालचंद्र महाराज संस्थानाचे आदर्श कार्य !

संस्थानच्या वतीने बाबांची पुण्यतिथी, जयंती, गुरुद्वादशी, गुरुपौर्णिमा आणि महाशिवरात्र हे उत्सव मोठ्या स्वरुपात साजरे केले जातात.